

Kolhapur News Hit And Run : कोल्हापुरात मध्यरात्री हीट अँड रनचा थरार पहायला मिळाला. गोकुळाचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या चिरंजीवाने दोघांना शिवाजी विद्यापीठ येथे उडवलं. यानंतर पद्मसिंह रणजितसिंह पाटील यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी विद्यापीठजवळ उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड हे जात असताना त्यांना पद्मसिंह पाटील याने जोरदार धडक दिली. त्या अपघातात या दोघा भावंडांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील संशयित आरोपी पद्मसिंह पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ड्रिंक अँड ड्राइव्ह चा प्रकार आहे का हे वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर तसा गुन्हा दाखल होणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.