Kolhapur Crime : गटारीच्या पाण्याच्या वादातून हेरलेत झटापट; एकाचा जागीच मृत्यू

हातकणंगले पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात
Kolhapur Crime  News
गटारीच्या पाण्याच्या वादातून हेरलेत झटापट; एकाचा जागीच मृत्यू
Published on: 
Updated on: 

हातकणंगले : हेरले (ता. हातकणंगल) येथे गटारीचे पाणी घरासमोर येत असल्याच्या कारणावरून झालेल्या झटापटीमध्ये मनोहर आनंदा लोहार (वय ५७) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याबाबतची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते. यातील संशयित आरोपीला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बुधवारी सायंकाळी हेरले आणि परिसरात दमदार पाऊस झाला. यावेळी मनोहर लोहार व संशयित आरोपी याकूब लाटकर या दोघा शेजाऱ्यांच्या घरासमोर असलेल्या गटारीत पाणी साचले. यावेळी लोहार हे गटारीतील पाणी बाजूला करत असताना शेजारीच राहणाऱ्या आयुब लाटकर ( वय ३५ ) यांच्याशी त्यांचा वाद झाला. लाटकर याने चिडून तुमच्यामुळे गटारीचे पाणी आमच्या घरात येते, असे म्हणत लोहार यांच्या घरी जाऊन वाद घातला. यावेळी झालेल्या झटापटीत लोहार यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी कर्मचाऱ्यासह दाखल झाले. तसेच, पोलिस उपविभागीय अधिकारी जयसिंगपूर अमोल ठाकूर यांनीही घटनास्थळी येऊन माहिती घेतली. मनोहर लोहार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news