Kasarde lake overflow Shahuwadi : शाहूवाडीतील कासार्डे तलाव ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार, पर्यटकांना बंदी

Kolhapur rain update: सुरक्षेचे कारण लक्षात घेता सदर धरण क्षेत्र हे निषिद्ध क्षेत्र घोषित करण्यात आले आहे
Kasarde lake overflow Shahuwadi : शाहूवाडीतील कासार्डे तलाव ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार, पर्यटकांना बंदी
Published on
Updated on

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील कासार्डे लघु पाझर तलाव आज (५ जुलै २०२६) सकाळी ८.१५ वाजता २.९९ द.ल.घ.मी. इतक्या आपल्या पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव पूर्ण भरला असून, प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Kasarde lake overflow Shahuwadi : शाहूवाडीतील कासार्डे तलाव ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार, पर्यटकांना बंदी
Heavy rainfall in Raigad : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला ! अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

तलाव पूर्ण भरल्यामुळे स्थानिक ओढे आणि पर्यायाने कडवी नदीच्या पात्रातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर पाटबंधारे विभागाने (उत्तर) नदीकाठच्या सर्व गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Kasarde lake overflow Shahuwadi : शाहूवाडीतील कासार्डे तलाव ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार, पर्यटकांना बंदी
Heavy rainfall in Raigad : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला ! अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

पर्यटकांना धरण क्षेत्रात प्रवेशबंदी

​पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक धरण परिसरात गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र, सुरक्षेचे कारण लक्षात घेता सदर धरण क्षेत्र हे निषिद्ध क्षेत्र घोषित करण्यात आले असून, पर्यटकांना येथे येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी पात्राजवळ जाणे टाळावे, जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news