Kolhapur heavy rainfall | नृसिंहवाडीत कृष्णा-पंचगंगा संगमाला पुराचा वेढा!

गेल्या २४ तासात ६ ते ७ फुटाने पाणीपातळीत वाढ
नृसिंहवाडी : येथील संगम मंदिराजवळ पाण्याचा वेढा पडला आहे. (छाया - दर्शन वडेर)
नृसिंहवाडी : येथील संगम मंदिराजवळ पाण्याचा वेढा पडला आहे. (छाया - दर्शन वडेर)
Published on
Updated on

नृसिंहवाडी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात ६ ते ७ फुटाने पाणी वाढल्याने येथील कृष्णा-पंचगंगा संगम मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

संगम घाटावरील मंदिराच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या असून, नदीकाठची मंदिरे आणि परिसरातील काही भागांत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नदीपात्रात न जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पुराची ही स्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील आपत्ती व्यवस्थापन सतर्क ठेवण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पुराच्या पाण्याने वेढलेला हा परिसर पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी होत असली तरी, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दत्त मंदिराजवळील हा संगम परिसर सध्या जलमय झाला असून, नद्यांच्या प्रवाहाचा वेगही वाढला आहे.

दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात श्रींच्या पादुकांवर कृष्णा नदीचा प्रवाह आल्यास दक्षिणद्वार सोहळा संपन्न होतो. मागील वर्षी हा सोहळा २४ जून रोजी पार पडला होता मात्र यंदा जुलै उजाडला तरी पाणी मंदिरात आले नाही. या पवित्र स्नानासाठी भाविकांना आस लागून राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news