Kolhapur Heavy Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

26, 27 जुलै रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
Kolhapur Heavy Rain
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर Pudhari File Photo

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Kolhapur Heavy Rain : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 26 व 27 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे.

पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news