Kolhapur News : हारुगडेवाडीत बिबट्याचा थरार! शेळीवर हल्ला करून शेतात नेले फरफटत

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on
Updated on

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील हारुगडेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्याची थरारक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी ५:३० च्या सुमारास घडली. शेतात असलेल्या विश्वास हारुगडे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला थेट उसाच्या शेतात फरफटत नेले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हारुगडेवाडी येथे अनेक दिवसांपासून शेतशिवारात बिबट्यांचा वावर असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे  माळवाडी भागात विश्वास लक्ष्मण हारुगडे यांच्या जनावरांचा गोठी आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी जनावरे शेडजवळ बांधली होती यावेळी शेजारी असलेल्या उसाच्या शेतातून बिबट्याने अचानक बाहेर येत शेडच्या कडेला असलेल्या शेळीवर हल्ला करून तिला उसाच्या शेतात फरफटत नेले. या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news