कोल्हापूर : निम्म्या शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद

बालिंगा उपकेंद्रात 33 केव्ही वाहिनीची दुरुस्ती
Water supply off
File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : महावितरण कंपनीच्या बालिंगा उपकेंद्रातील 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीच्या मासिक दुरुस्तीमुळे सोमवारी (दि. 3) पाणी उपसा होणार नाही. त्यामुळे सोमवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ए आणि बी वॉर्ड व संलग्न उपनगरांचा यात समावेश आहे. या भागात मंगळवारीही (दि. 4) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

ए, बी वॉर्डमधील उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत येणार्‍या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेचा काही भाग, संपूर्ण सी आणि डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, बह्मपुरी, बुधवार पेठ तालीम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी परिसर, देवल क्लब व त्यास संलग्नित ग्रामीण भाग व उपनगरे, ई वॉर्ड, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5 वी ते 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागांमध्ये दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news