Kolhapur News : १८०० दूध संस्‍थांची चौकशी सुरू

गोकुळ प्रशासनाकडून त्रिसदस्‍यीय समितीला माहिती; लवकरच कागदपत्रांची पडताळणी
Gokul Milk Union
Gokul Milk Union
Published on
Updated on

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळच्‍या २०२१ नंतर नोंदणी झालेल्‍या १८०० दूध संस्‍थांच्‍या चौकशीला लवकरच सुरुवात होणार आहे. त्रिसदस्‍यीय समितीचे अध्‍यक्ष कृष्‍णा ठाकरे यांच्‍याकडे गोकुळने संबंधित संस्‍थांची माहिती सादर केली आहे. संस्‍थांच्‍या कागदपत्रांच्‍या पडताळणीला पुढील दोन दिवसात सुरुवात होण्‍याची शक्‍यता आहे.

गोकुळच्‍या २०२१ नंतर नोंदणी झालेल्‍या दूध संस्‍थांची चौकशी करण्‍याची मागणी महादेव दूध संस्‍थंचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी केली होती. तक्रारीनुसार संस्‍थांच्‍या चौकशीसाठी तत्‍कालीन विभागीय उपनिबंधक यांनी सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्रिसदस्‍यीय समिती नियुक्‍त केली होती. नियुक्‍ती दरम्‍यान ठाकरे यांना अवसायनातील दूध संस्‍थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करायची असल्‍याने ही चौकशी प्रलंबित राहिली होती.

अवसायनातील दूध संस्‍थांची चौकशी पूर्ण झाल्‍यानंतर ठाकरे यांनी गोकुळच्‍या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयाला भेट देऊन प्रशासनाकडे २०२१ नंतर नोंदणी झालेल्‍या दूध संस्‍थांची माहिती मागितली होती. त्‍यानुसार गोकुळने १८०० दूध संस्‍थांची माहिती चौकशी समितीकडे सादर केली आहे. कागदपत्रांच्‍या पडताळणीला लवकरच सुरुवात होणार आहे. चौकशीमध्‍ये संबंधित दूध संस्‍थेची नोंदणी, संकलन, निवडणुक, लेखापरीक्षण मुदतीत झाले आहे का, आदी बाबी तपासल्‍या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news