Gokul Election : ४१० दूध संस्थांचाही गोकुळ मतदार यादीत समावेश

महादेव दूध संस्थेची याचिका सहकार न्यायालयाने फेटाळली
Gokul Election |
Gokul Election |
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळ निवडणूक प्रक्रियेत अदृश्य शक्तीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. सभासदत्व रद्द करण्यासंदर्भात महादेव दूध संस्थेने दाखल केलेली याचिका शुक्रवारी सहकार न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे या ४१० दूध संस्थांचाही गोकुळ मतदार यादीतील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच संस्थांचे गोकुळचे सभासदत्वही कायम राहिले आहे.

गोकुळने चुकीच्या पद्धतीने सभासदत्व दिल्याचा आरोप करत वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ संलग्न ४१० दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्यासंदर्भातील याचिका सहकार न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर गेली महिनाभर सुनावणी सुरू होती. शुक्रवारी याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. कल्याणी बेलवाडे यांचा अंतरिम मनाई अर्ज फेटाळला गेला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या संस्थांचे गोकुळचे सभासदत्व कायम राहिले आहे.

न्याय मिळाला..!

न्यायालयीन लढाईत अवसायनातील ४९२, कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक असलेल्या १७५ दूध संस्थांना कोल्हापूर सर्किट बेंचमधील सुनावणीत गुरुवारी न्याय मिळाला. सहकार न्यायालयातही आणखी ४१० संस्थांना शुक्रवारी न्याय मिळाला. न्यायालयाने पात्र ठरवलेल्या या संस्था अदृश्य शक्तीसाठी एक प्रकारे धक्काच आहेत, अशी चर्चा आता सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news