

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याचा बुधवारी (दि.१) अखेरचा दिवस आहे. सहायक निबंधक कार्यालयात मंगळवारी ६८३ ठराव दाखल झाले, तर आजअखेर ५३३३ ठराव सादर झाले आहेत. अखेरच्या टप्प्यात रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.
अवसायन, सभासदत्व रद्द केलेल्या संस्था वगळता ४५७५ संस्था पात्र आहेत; पण सहायक निबंधक कार्यालयाकडे ५३३३ ठराव दाखल झाले आहेत. पात्र संस्थांच्या तुलनेत ७५८ ठराव ज्यादा आले आहेत. ठराव दाखलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राप्त ठरावांची छाननी होईल. दुबार ठराव बाजूला करून त्या ठरावांवर सुनावणीनंतर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर प्रारूप मतदार यादी विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्याकडे सादर केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी १५ दिवसांचा कालावधी लागेल. त्यानुसार १५ जुलैनंतर गोकुळची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल.