Gokul Election : समविचारी आघाडीचे ४८३ ठराव दाखल

‘गोकुळ’साठी आतापर्यंत १४६२ दाखल तर १८५८ ठराव असल्‍याचा आ. सतेज पाटलांचा दावा; उर्वरित आज दाखल
Gokul Election |
Gokul Election
Published on
Updated on

कोल्‍हापूर : राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडीने आजअखेर १४६२ ठराव सहायक निबंधक कार्यालयात दाखल केले आहेत. यापूर्वी ९७९ तर मंगळवारी दिवसभरात ४८३ ठराव सादर केले. आघाडीकडे १८५८ ठराव हातामध्‍ये असल्‍याचा दावा आ. सतेज पाटील यांनी केला. यापैकी १४६२ ठराव दाखल झाले असून उर्वरित ठराव बुधवारी (दि.१) सादर केले जाणार आहेत.

आमदार सतेज पाटील यांच्‍या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा मंगळवारी (दि. ३०) मेळावा झाला. गोकुळसाठी ४५७५ दूध संस्‍था पात्र असताना महायुतीकडे आत्ताच ५३०० ठराव गोळा झाले आहेत. महायुतीत गोकुळमध्‍ये मोठा भाऊ कोण यावरून चढाओढ सुरू आहे. यामधून त्‍यांच्‍याकडे ठरावांचा आकडा केवळ फुगला आहे. समविचारी आघाडीकडे १८८१ ठराव असून या आकड्यामध्‍ये कोणताही बदल होणार नाही. ४१९ संस्‍थांचे ठराव बुधवारी सादर करणार आहेत, असा दावा मेळाव्‍यात आ. पाटील यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news