Gokul Election| गोकुळ : उमेदवारी अर्ज भरण्‍यास १० सप्‍टेंबरपासून सुरुवात?

दुग्‍ध विभागाकडून निवडणूक प्रक्रियेच्‍या हालचाली सुरू
Gokul election |
Gokul election |
Published on
Updated on

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याच्‍या प्रक्रियेला १० सप्‍टेंबरपासून सुरुवात होण्‍याची शक्‍यता आहे. निवडणूक प्रक्रियेच्‍या हालचाली दुग्‍ध विभागाकडून सुरू झाल्‍या आहेत. सध्‍या निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्‍त करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव तयार करण्‍याचे काम सुरू आहे. ३१ ऑगस्‍टपर्यंत हा प्रस्‍ताव सहकारी निवडणूक प्राधिकरणकडे सादर होईल.

जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक नारायण परजणे ऑगस्‍टअखेरपर्यंत गोकुळ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्‍त करण्‍यासंदर्भातील प्रस्‍ताव प्राधिकरणकडे सादर करतील. यानंतर ५ सप्‍टेंबरपर्यंत निवडणूक अधिकार्‍यांची नियुक्‍ती होईल. नियुक्‍तीनंतर निवडणूक अधिकारी चार ते पाच दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. त्‍यानुसार १० किंवा ११ सप्‍टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. १५ ते १६ सप्‍टेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालेल. यानंतर १० ऑक्‍टोबरपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेणे, चिन्‍ह वाटप करणे, मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news