Kolhapur Gokul dairy: सर्वोच्च न्यायालयात आज ‌‘गोकुळ‌’बाबत निर्णय शक्य

Gokul Dairy
Gokul Dairy File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : ‌ ‘गोकुळ‌’ निवडणूक आणि संचालक मंडळाला मुदतवाढ मिळण्याबाबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (दि. 6) अंतिम सुनावणी होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे जाणून घेतले. न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोल्हापूर सर्किट बेंचने गुरुवारी (30 एप्रिल) ‌‘गोकुळ‌’ संलग्न अवसायन प्रक्रियेतील 1,300 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण करा, मगच निवडणूक घ्या, असा निर्णय देत संचालक मंडळाची मुदतवाढ फेटाळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news