Kolhapur to Goa flight service
Kolhapur to Goa flight servicePudhari File Photo

Kolhapur to Goa flight service: कोल्हापूर-गोवा आता 25 मिनिटांत

लवकरच विमानसेवा; कंपनीची प्रक्रिया सुरू
Published on
अनिल देशमुख

कोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्यात आता केवळ 25 मिनिटांत पोहोचता येणार आहे. कोल्हापूर गोव्याशी हवाई मार्गानेही जोडले जाणार आहे. या मार्गावर लवकरच विमानसेवा सुरू होत असून, कंपनीने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

‌‘फ्लाय-91‌’ या कंपनीने गोवा-कोल्हापूर, कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद-कोल्हापूर आणि कोल्हापूर-गोवा, अशी विमानसेवा सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे. त्यानुसार प्रक्रियाही सुरू केली आहे.

कंपनीच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने कोल्हापूर विमानतळाचा सोमवारी दौरा केला. कंपनीच्या विमान सुरक्षा विभागाचे उपमुख्य अधिकारी सत्येंद्र शर्मा आणि कॅप्टन अगरवाल यांनी विमानतळावरील सुविधांची पाहणी केली. त्यांनी विमानतळ प्राधिकरण, हवाई वाहतूक नियंत्रण विभाग, ऑपरेशन विभाग, सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. त्यात सकारात्मक चर्चा झाली. कंपनीला आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी यावेळी दिली. या बैठकीला हवाई वाहतूक विभागाचे प्रमुख अंकित व्यास, नियंत्रक नयन रॉय, ऑपरेशन चीफ राजेश पेडणेकर, सुरक्षा विभागप्रमुख पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्यासह विमान कंपन्यांचेही अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news