Kolhapur Girl Ranga Panchami Drama Video: तरूणीचा धिंगाणा... रंगपंचमीची नशा, पोलिसांना शिवीगाळ करत घेतला चावा!

Kolhapur Drunk Girl Ranga Panchami Drama Video: कोल्हापूरच्या आर. के. नगर ते मोरेवाडी रस्त्यावर रंगपंचमीच्या दिवशी एका तरुणीने भररस्त्यात मोठा धिंगाणा घातला. या तरुणीने तिला समजावण्यासाठी आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल रुबीना पटेल यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि त्यांच्या हाताचा जोरात चावा घेतला. एवढेच नव्हे तर तिने पोलिसांच्या डोळ्याखाली नख्यांनी ओरबडून त्यांना जखमी देखील केले. नशेत असलेल्या या तरुणीचा 'ड्रामा' पाहून परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news