कोल्हापूर : खंडणी प्रकरणातील जर्मनी गँगचा म्होरक्या आनंदा जाधवला अटक

तपासासाठी फिरवले
Kolhapur News
कोल्हापूर : खंडणी प्रकरणातील जर्मनी गँगचा म्होरक्या आनंदा जाधवला अटक
Published on
Updated on

इचलकरंजी : ‘जर्मन गँग’च्या नावाने दहशत माजवून शस्त्राचा धाक दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणातील मुख्य संशयित आणि जर्मनी गँगचा म्होरक्या आनंदा शेखर जाधव ऊर्फ जर्मनी (वय 26, रा. जवाहरनगर) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, जर्मनी याला तपासासाठी शिवाजीनगरचे पो.नि. सचिन पाटील व त्यांच्या पथकाने कोल्हापूर रस्त्यावरील गुन्हा घडलेल्या ठिकाणी फिरवले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात होता.

कोल्हापूर रस्त्यावर उमेश म्हेत्रे यांचे हॉटेल आहे. ऑगस्ट 2023 मध्ये हॉटेलमध्ये घुसून म्हेत्रे यांना व त्यांच्या मुलास मारहाण मारहाण करीत चाकूचा धाक दाखवत ड्रॉव्हरमधील 7 हजारांची रोकड काढून घेत दहशत माजवली होती. ‘आम्ही आनंद्या जर्मनी गँगचे असून तू ओळखत नाहीस काय’, असे म्हणत खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 7 जणांवर ‘मोका’ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी बजरंग फातले, अमर शिंगे, शुभम पट्टणकुडे, लोखंडे आणि अन्य दोघे अशा 6 जणांना यापूर्वीच अटक केली आहे. घटनेनंतर आनंदा जर्मनी हा फरार होता. त्यानंतर जर्मनी टोळीवर सातव्यांना ‘मोका’ लावण्यात आला होता. सातारा येथील एका गुन्ह्यात संशयित आनंदा जर्मनी याला अटक केली होती. न्यायालयाच्या परवानगीने महिन्यापूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी आनंदाला ताब्यात घेऊन अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 11 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास उपअधीक्षक समीरसिंह साळवे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news