kolhapur | ‘फिफा’च्या वर्ल्डकप फायनलसाठी कोल्हापूर सज्ज...

ठिकठिकाणी भव्य स्क्रीनची व्यवस्था : विजेता अर्जेंटिना की स्पेन प्रचंड उत्सुकता
कोल्हापूर : रविवारी मध्यरात्री रंगणारा वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी शहरातील तालीम-मंडळांनी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. बालगोपाल तालीम मंडळ येथे संपूर्ण स्पर्धा भर पावसात पाहण्यात आली.
कोल्हापूर : रविवारी मध्यरात्री रंगणारा वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी शहरातील तालीम-मंडळांनी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. बालगोपाल तालीम मंडळ येथे संपूर्ण स्पर्धा भर पावसात पाहण्यात आली. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेची सांगता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. फुटबॉलवेड्या कोल्हापूर स्पर्धेच्या फायनलसाठी सज्ज झाले आहे. अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांच्यात अंतिम सामना होणार असून, विजेता कोण? याची प्रचंड उत्सुकता अवघ्या जगाला लागली आहे.

अंतिम सामन्यासाठी स्क्रीन, टीव्हीची व्यवस्था

फुटबॉलवेड्या कोल्हापुरात वर्ल्डकप सुरू झाल्यापासूनचे सामने रात्रभर जागून पाहिले जात आहेत. यात अबालवृद्ध आणि महिलांचा समावेश आहे. बालगोपाल तालीम मंडळाने तर संपूर्ण स्पर्धेतील सामने एकत्रितपणे स्क्रीनवर लावून पाहिले. अंतिम सामन्यासाठी खुर्च्या व चहाची व्यवस्था केली आहे. याशिवाय ठिकठिकाणी स्क्रीन व टीव्हींची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रात्री ११.३० वाजल्यापासून स्टेशन रोडवरील कार्यालयात सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मिरजकर तिकटी येथे भाजपच्या वतीने भव्य स्क्रीन लावण्यात येणार असून, रविवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पेठांतील अनेक तालीम संस्थांमध्ये पावसामुळे टीव्ही व स्क्रीनची व्यवस्था मंडळांच्या हॉलमध्ये करण्यात आली आहे.

रविवार असल्याने तांबड्या-पांढऱ्याचे नियोजन

अंतिम सामना रविवारी असल्याने कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा मंडळाचे नियोजनही मंडळांनी केले आहे. रात्री रस्सामंडळ करून झाल्यावर सामन्याचा आनंद लुटण्याचे नियोजन फुटबॉलप्रेमींनी केले आहे. अनेक तालीम मंडळांनी आपल्या आवडत्या मेस्सीच्या अर्जेंटिना संघाच्या विजयाचा जल्लोष करण्याचे नियोजन केले आहे. घरा-घरांतही सहकुटुंब सामना पाहण्यापूर्वी रविवारचा तांबडा-पांढऱ्याच्या बेत आखण्यात आला आहे. यात महिलामंडळही आघाडीवर आहे. रविवारची रात्र जागायची असल्याने अनेकांनी त्यानुसार झोपेचे नियोजन केले आहे. तर बहुतांशी लोकांनी सोमवारी शाळा-महाविद्यालय आणि नोकरीला दांडी मारायचे ठरवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news