Kolhapur Crime : गंजी गल्ली हल्लाप्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी

अल्पवयीन तरुणाची बालसुधारगृहात रवानगी
Kolhapur Crime News
गंजी गल्ली हल्लाप्रकरणी संशयितांना पोलीस कोठडीpudhari photo
Published on
Updated on

कोल्हापूर : सोमवार पेठ, गंजी गल्ली येथील सागर पाटोळे आणि प्रसाद बुलबुले कुटुंबीयांत पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारीप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली. दोघांना पोलिस कोठडी, तर अल्पवयीन तरुणाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

गुरुवारी दुपारी सोमवार पेठ, गंजी गल्ली येथे झालेल्या वादावादीत गळ्यावर धारदार चाकूने हल्ला झाल्याने सागर बाळकृष्ण पाटोळे ( वय ३६, रा. गंजी गल्ली) याची प्रकृती गंभीर बनली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पाटोळे यांच्यावरील हल्लाप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केलेल्या प्रमोद बुलबुले (वय ५२) व राजू बुलबुले (२३, रा. गंजी गल्ली, कोल्हापूर) यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. अल्पवयीन तरुणाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याचे तपास अधिकारी श्रीराम कन्हेरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news