Kolhapur Crime : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातून २४ सराईत गुन्हेगार तडीपार

उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश
तडीपार
तडीपारPudhari File Photo
Published on
Updated on
इंद्रजित शिंदे

पन्हाळा : सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिलेखावरील २४ सराईत आरोपींना पन्हाळा तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी पाठवलेल्या अहवालानुसार, पन्हाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी हे तडीपारीचे आदेश पारित केले आहेत.

या कारवाईत नितीन भीमराव धनगर (आसुर्ले), महेश धोंडीराम म्हामणे (आसुर्ले), संदीप बाबुराव लाड (आळवे), पांडुरंग बाबुराव लाड (आळवे), उमेश श्रीपती सावंत (कोलोली), अनिकेत बळवंत कदम (यवलुज), पोपट श्रीपती गायकवाड (पिंपळे तर्फ भाचरवाडी), लक्ष्मण दिनकर गायकवाड (पिंपळे तर्फ भाचरवाडी), अक्षय आनंदा माने (यवलुज), संदीप नामदेव जाधव (कोलोली), विकास विलास वांद्रे (तिरपण), विक्रम पोपट गायकवाड (पिंपळे तर्फ भाचरवाडी), विलास मारुती चौगुले (कोलोली), ऋषिकेश विलास चौगुले (कोलोली), सुरेश ज्ञानदेव जाधव (आसुर्ले), नंदकुमार ज्ञानदेव जाधव (आसुर्ले), प्रल्हाद शामराव पाटील (तिरपण), विलास लक्ष्मण पाटील (तिरपण), दिलीप दिनकर लोखंडे (तिरपण), अभिजीत प्रकाश कांबळे (उंड्री), आकाश प्रकाश कांबळे (उंड्री), सुरेश रंगराव लोखंडे (माजगाव), भाऊसो विष्णु पलंगे (खोतवाडी) आणि सुमित शंकर सातपुते (कोलोली) या २४ जणांना गणेशोत्सव कालावधीत पन्हाळा तालुक्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

तडीपारीचा आदेश दिलेले हे आरोपी मनाई केलेल्या कालावधीत पन्हाळा तालुका क्षेत्रात दिसून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news