Kolhapur News : विसर्जन मिरवणुकीत ‘अँटिड्रोन’ गन

गडचिरोली येथून दोन गन दाखल; विसर्जन मार्गावर पोलिसांचे सशस्त्र संचलन
Kolhapur News
विसर्जन मार्गावर पोलिसांचे सशस्त्र संचलन
Published on
Updated on

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर यंदा प्रथमच अँटिड्रोन गनचा वापर केला जाणार आहे. विनापरवाना ड्रोन विरोधात या गनचा वापर करून ड्रोन निकामी केले जाणार आहेत. गडचिरोली येथून दोन अँटिड्रोन गन चार प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह कोल्हापुरात दाखल झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

दरम्यान, बुधवारी (दि. २३) सायंकाळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विसर्जन मार्गावर सशस्त्र संचलन केले. दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेस या मार्गावर संचलन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, सुशांत चव्हाण, विकास जाधव, श्रीराम कन्हेरकर, नंदकुमार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

मिरवणुकीत दोन ट्रॉलींनाच परवानगी देण्यात येणार आहे. गुरुवारी रात्रीपासून पोलिसांचे पथक सर्व ठिकाणी ट्रॉलीसह प्रेशर मिड, लेसर लाईट, सिओटीची तपासणी करणार आहे. मंडळांकडून या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचनाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

सात पथके तैनात

वाहन तपासणीसह स्ट्रक्चर मोजणीसाठी पथक तैनात (प्रादेशिक परिवहन, पोलीस)

लेसर, प्रेशर मिड, सिओटूसाठी पथक

आवाज मर्यादा तपासण्यासाठी प्रादेशिक प्रदूषण मंडळाचे अधिकारी

मुख्य मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची नजर

महिला सुरक्षेसाठी निर्भया पथके

चार हजार पोलिसांचा खडा पहारा

हद्दपार गुंडांवर विशेष नजर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news