

कोल्हापूर/गांधीनगर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रविवारी तावडे हॉटेल परिसरातील गांधीनगर मुख्य रस्त्यालगत असणारे अनधिकृत होर्डिंग काढून टाकत कारवाईस सुरुवात केली. ही मोहीम रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राबवण्यात आली. यावेळी व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती.
महापालिकेच्या हद्दीतील विनापरवाना बांधकामांवर कारवाईचा मुद्दा गाजत असताना अचानकपणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हद्दीत असणाऱ्या अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यास सुरुवात केली. दरम्यान, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी विनापरवाना बांधकामांची पाहणी करून यातील काही संबंधित बांधकामधारकांना कारवाईबाबत सूचना दिल्या. या अतिक्रमण मोहिमेत जेसीबी, डंपर, अग्निशमन दलाच्या साहाय्याने कारवाईस सुरुवात केली.