Kolhapur Flood : कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंदच; बालिंगा पुलाजवळ रस्त्यावर चार फूट पाणी

दोनवडे ते बालिंगे दरम्यान रस्त्यावर सुमारे चार फूट पुराचे पाणी
Kolhapur-Gaganbawda road closed; Four feet of water on the road near Balinga bridge
कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंदच; बालिंगा पुलाजवळ रस्त्यावर चार फूट पाणीPudhari Photo
Published on
Updated on

दोनवडे : श्रीकांत पाटील

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुल वाहतुकीसाठी अद्याप बंदच आहे. दोनवडे ते बालिंगे दरम्यान सुमारे चार फूट रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे पश्चिम भागाचा कोल्हापूर शहराशी संपर्क तुटला आहे. पाणीपातळी सध्या स्थिर असून वाढ नाही झाली तर, मार्ग सुरू होण्यास दोन दिवस लागू शकतात.

Kolhapur-Gaganbawda road closed; Four feet of water on the road near Balinga bridge
Kolhapur Rain Updates | शाहूवाडीत १४१ मालमत्तांची पडझड ; ६३ लाखांचे नुकसान

दोनवडे पासून पश्चिमेला असणाऱ्या रस्त्यावर दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान शुकशुकाट होता. दुपारनंतर पूर पाहण्यासाठी दोनवडे फाट्यावर बघ्यांची गर्दी झाली आहे. सध्या पूरस्थिती जैसे थे आहे. पावसाचा जोर वाढल्यास आणखी पुराची भीती आहे. नदीकाठच्या गावातील लोकांनी आपले साहित्य अगोदरच गुंडाळले आहे. पुराच्या शक्यतेमुळे नदीकडेच्या गावातील लोक सतर्क झाले आहेत. कोणत्याही क्षणी पूराची शक्यता असल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news