Gadhinglaj Accident | गडहिंग्लज बसस्थानकानजीक महिला बसखाली जाण्यापासून बचावली : थरारक प्रसंग सीसीटीव्हीत कैद

सुदैवाने महिला बसखाली सापडली नाही, मात्र,गंभीररित्या जखमी
Gadhinglaj bus stand accident
Gadhinglaj bus stand accidentPudhari
Published on
Updated on

Gadhinglaj bus stand accident

गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज बसस्थानकानजीक बस बसस्थानकामध्ये जात असताना डाव्या बाजूला असलेली महिला चालकाला दिसली नसल्याने तिला एसटीचा जोरात धक्का बसून ती चाकाखाली आली होती. सुदैवाने महिला बस खाली सापडली नाही. मात्र, ती गंभीररित्या जखमी झाली.

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून अंगावर शहारे येण्यासारखा प्रसंग आहे. गडहिंग्लज शहरातील सविता बिलावर या कामानिमित्त बसस्थानकाकडे जात असताना त्याच दरम्यानआलेल्या एसटीने त्यांना डाव्या बाजूला धडक दिली. चालकालाही महिला समोर आल्याचे लक्षात न आल्याने तिला एसटीची धडक बसली.

Gadhinglaj bus stand accident
Kolhapur accident news | झाडाला ट्रक आदळून घाटकरवाडीचा युवक ठार

ही महिला चाकाखाली जाण्यापासून थोडक्यात बचावली. चालकाने ही प्रसंगावधान राखून ब्रेक दाबला. एसटी बसच्या धक्क्याने मात्र महिलेच्या मणक्याला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर महिला सुदैवाने बचावल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news