कोल्हापूर : सरवडेत पावणेचार किलो गांजा जप्त, सात मोटरसायकलीसह आठ जण ताब्यात

File Photo
File Photo
Published on
Updated on

राशिवडे; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त करत आठजणांना अटक करण्यात आली आहे. मालवे-बोरवडे मार्गावरील पाटबंधारे विभागाजवळील कॉलनीजवळसुमारे पावणेचार किलो गांजा विक्री व खरेदीसाठी आणलेला होता. यामध्ये ७६२८० रुपये किंमतीच्या गांज्यासह सात मोटारसायकली, मोबाईल असा एकूण सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

याबाबत मिळालेली माहीती अशी की, सरवडे येथील मालवे-बोरवडेकडे जाणाऱ्या पाटबंधारे विभागाजवळ गांजा विक्री केली जात असल्याची माहीती राधानगरी पोलीसांना मिळाली. त्यानुसार याठिकाणी सोमवारी (दि. १५) दुपारी दिडच्या दरम्यान छापा टाकला असता राहुल कृष्णात पाटील, अनिल बाबुराव तावडे (दोघेही सरवडे) तर  संतोष तानाजी कांबळे (रा.तिटवे ता.राधानगरी), अनिकेत सुभाष चौगले (रा.अर्जुनवाडा ता.राधानगरी), दिपक आनंदा सुर्यवंशी (कसबा तारळे), अभिमन्यु महादेव धावरे (रा. तुरंबे ता.राधानगरी), उतम तानाजी रानमाळे (रा.सरवडे ता.राधानगरी), संजय सदाशिव माळी (रा.बस्तवडे ता.कागल), अजित दतात्रय पाटील (मालवे ता.राधानगरी)  यांना ७६ हजार २८० रुपये किंमतीच्या ३ किलो ८१४ग्रँम वजनाच्या गांज्यासह ताब्यात घेण्यात आले.

यामधील राहुल पाटील व अनिकेत तावडे हे दोघे गांजा खरेदीसाठी आले होते, त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडुन  गांजासह ४ लाख ४८ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल  हस्तगत करण्यात आला. यामध्ये  अकरा मोबाईल, सात मोटरसायकलीचा समावेश आहे. अधिक तपास पो.नि.स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ, कृष्णा यादव, के.डी.लोकरे, अरविंद पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news