Kolhapur News : अकरा वनक्षेत्रांमध्ये ५१८ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

कोल्हापूर वन विभागाचा जल व वन्यजीव संवर्धनासाठी पुढाकार
Kolhapur News
अकरा वनक्षेत्रांमध्ये ५१८ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : वनक्षेत्रातील जलस्रोतांचे संवर्धन, पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, जल व मृदा संवर्धनास चालना देणे तसेच वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाण्याची उपलब्धता करून देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर वन विभागामार्फत वनराई बंधारे व नैसर्गिक जलस्रोत संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत कोल्हापूर वन विभागातील ११ वनपरिक्षेत्रांमध्ये एकूण ५१८ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

स्थानिक भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक नाले, ओढे, पाण्याचा प्रवाह आणि उपलब्ध जलस्रोतांचा विचार करून योग्य ठिकाणी या वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. एकूण एक हजार वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

जल व मृदा संवर्धनास चालना

वनक्षेत्रात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. हे पाणी अडवून त्याचा वेग कमी करणे, जमिनीत पाणी मुरविणे आणि भूजल पुनर्भरणास चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे पाण्याचा साठा निर्माण होण्यासोबतच मृदा धूप कमी होण्यास आणि जल व मृदा संवर्धनास मदत होणार आहे. तसेच वनक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोत अधिक काळ टिकून राहण्यास या कामांचा उपयोग होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news