Kolhapur crime news | विनापरवाना लाकूड वाहतूक...दोघांवर गुन्हा दाखल

ट्रॅक्टरसह ११ लाखाचा मुददेमाल जप्त, वनविभागाची कारवाई
Kolhapur crime news | विनापरवाना लाकूड वाहतूक...दोघांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

नागाव: विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या दोघांवर वनविभागाने कारवाई करत ११ लाखाचा मुददेमाल जप्त केला. हि कारवाई मौजे वडगांव ते नागाव रस्त्यावर करण्यात आली आहे. वनविभागाने कारवाई केल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

वनविभागाकडून मिळालेली माहीती अशी की, नागाव (ता. हातकणंगले) येथील पवन महादेव लोंढे व ट्रॅक्टर मालक सुदर्शन अरुण बिरांजे हे दोघे विनापरवाना मौजे वडगाव ते नागाव दरम्यान लाकूड वाहतूक करत होते. दरम्यान वनविभागाच्या गस्त पथकाने मौजे वडगांव गावच्या हद्दीत लाकूड घेवून जाणारा ट्रॅक्टर ( क्र. एम एच ५१ ए २८७७) आडवला. यामधील पवन लोंढे व सुदर्शन बिरांजे यांच्याकडे चौकशी केली असता कसलेही अधिकृत परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.

लोंढे याची नागाव येथील आपट्याच्या माळावर लाकूड वखार असून तेथे हा विनापरवाना झाडे तोडून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई ३० जानेवारी रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास नंदकुमार नलवडे वनक्षेत्रपाल करवीर, कुंडलिक कांबळे वनपाल व प्रदीप जोशी वनरक्षक नरंदे यानी भागात गस्त घालत असताना केली. त्यानुसार वनरक्षक नरंदे यांनी ट्रॅक्टर चालक आणि लाकूड मालक यांच्यावर वनगुन्हा (प्र.रि.गु.क्र. ०१/२०२६) नोंदवत ११ लाखाचा मुददेमाल जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news