शिरटी : कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपट्टीत सातत्याने वाढवत आहे. शिरटी - हसुर मार्गावरील रस्त्यावर आज (दि.२७) पाणी आल्याने सायंकाळी हा मार्ग पूर्णपणे बंद झाला. या रस्त्यावर सायंकाळपर्यंत सुमारे दोन ते अडीच फूट इतके पाणी होते. दरम्यान, हसुर येथील नागरिकांनी पुराच्या भीतीपोटी मोठ्या संख्येने जनावरांचे स्थलांतर केले असून काही कुटुंबांतील नागरिकांनीही स्थलांतर केले आहे.
दरम्यान, हसुर येथील नागरिकांची कनवाड - घालवाड या मार्गे वाहतुक सुरू आहे. मात्र पाण्याची पातळी आणखी वाढल्यास हसुर-कनवाड तसेच कनवाड ते शिरोळ हा मार्गदेखील बंद होण्याची शक्यता आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे हसुर ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.