Kolhapur Fire | सांगली फाटा येथे कागदी रद्दीच्या गोडाऊनला आग; टेम्पोही आगीच्या भस्मस्थानी लाखोचे नुकसान

लाखों रुपयांचे नुकसान, मोठ्या प्रमाणात कागदी रद्दी, पुठ्ठे असल्याने आग भडकली
Kolhapur Fire | सांगली फाटा येथे कागदी रद्दीच्या गोडाऊनला आग; टेम्पोही आगीच्या भस्मस्थानी लाखोचे नुकसान
Kolhapur Fire | सांगली फाटा येथे कागदी रद्दीच्या गोडाऊनला आग; टेम्पोही आगीच्या भस्मस्थानी लाखोचे नुकसान
Published on
Updated on

शिरोली पुलाची: येथील सांगली फाटा परिसरात असलेल्या पेपर कागदी रद्दीच्या गोडाऊनला मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत गोडाऊनमधील कागदी रद्दीसह दारात उभा असलेला मालवाहतूक टेम्पो आगीच्या भस्मस्थानी सापडून जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की , शिरोली सांगली फाटा येथे ‘प्रदीप कुमार अँड कंपनी’ या नावाने संदीप घोरपडे आणि प्रदीप घोरपडे यांचे रद्दीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कागदी रद्दी, पुठ्ठे आणि इतर ज्वलनशील साहित्य साठवलेले होते. मंगळवारी पहाटे अचानक गोडाऊन मध्ये आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.

गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर कागदी साहित्य असल्यामुळे आगीने वेळातच संपूर्ण गोदाम व्यापले. गोडाऊनच्या प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला मालवाहतूक टेम्पोही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आणि पूर्णतः जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच प्राथमिकता म्हणून ही आग आटोक्यात आणण्यासाठी सिलेंडर चा वापर केल्याचे बोलले जाते.अखेर कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका तसेच वडगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने पहाटे चार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाऊनमधील संपूर्ण रद्दी साहित्य आणि टेम्पो जळाल्याने मोठे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली परंतु आगीचे नेमके कारण शॉर्टसर्किटने की ज्वलनशील पदार्थाने हे गुलदस्त्यातच राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news