

बांबवडे : विरळे व थावडे ता शाहूवाडी येथील देसकत नावाच्या शेतात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शॉट सर्किट मुळे अचानक आग लागून सुमारे ३० एकर शेतातील ऊस जळून खाक झाला, गावचे सरपंच सुरेश पाटील यांन्य ऊस तोडणी करणाऱ्या लोकाना बोलावून आग आटोक्यात आणली.
विरळे आणि शेजारील थावडे येथाल शेतात शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेतावरील जाणाऱ्या विजेच्या तारां मधून शॉट सर्किट झाले आणि त्यातून ऊसाच्या शेतास आग लागली बघता बघताा आगिने रौद्र रूप धारण केले, आणि त्यात ३० ते ३५ एकर मधील ऊस जळाला, या वेळी परिसरातील अन्य ऊस तोड कामगार यांना सोबत घेऊन सरपंच सुरेश पाटील यांनी लागलेली आग विजवण्याचा प्रयंत्न केला.
या आगित विरळे व थावडे येथील शिवाजी तुकाराम पाटील, तानाजी गणपती पाटील, रघूनाथ अनंत पाटील, शामराव दळवी, नाना दादू पाटील, संजय पांडूरग पाटील, शिवाजी कोडीबा कुंभार, के डी पाटील,गणपती दगडू लोकरे या शेतकऱ्या च्या मालकीचा ऊस जळून खाक झाला.या घटनेची माहिती तालुका महसूल विभाग व विज मंडळास कळवण्यात आले असल्याचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यानी सागितले.
विजेच्या शॉट सर्किट ने लागली ही आग खूप व्यापक होती बगता बगता आगीने ऊसाच्या आजू बाजचा परिसर व्यापून टाकला. या वेळी शेतात काम करणार्या लोकांनी अन्य लोकांना सपर्क करून आग विजवण्याचा प्रयत्न केला. यात गावचे सरपत सुरेश पाटील यांनी अन्य ठोळ्यातील लोकांना बोलावून आग विजवण्याचा प्रयत्न केला.