Kolhapur Accident : गवतामध्ये झोपलेल्या वृद्धाचा डोक्यावरून चाक गेल्याने मृत्यू

उत्तूर-भादवण मार्गावर मडिलगेजवळ घटना
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

उत्तूर : उत्तूर-भादवण मार्गावर मडिलगे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत होन्याळी (ता. आजरा) येथील जोतिबा पुंडलिक सूर्यवंशी (वय ६०) यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला गवतामध्ये झोपलेल्या सूर्यवंशी यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास रविराज हॉटेलजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जोतिबा सूर्यवंशी हे उत्तूर-भादवण मार्गावरील मडिलगे गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला गवतामध्ये झोपले होते. यावेळी तेथून जाणाऱ्या अज्ञात वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पंकज सूर्यवंशी यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल येलकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news