Kolhapur News : दिव्यांच्या लखलखाटात लक्ष्मीपूजन उत्साहात

फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळला
Kolhapur News
दिव्यांच्या लखलखाटात लक्ष्मीपूजन उत्साहात
Published on
Updated on

कोल्हापूर : दीपोत्सवातील महत्त्वाचा दिवस असलेल्या लक्ष्मीपूजनाचा विधी मंगळवारी मांगल्यदायी व भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी तसेच व्यापारी पेठांमध्ये लक्ष्मी, कुबेर आणि गणेशपूजन करून समृद्धीची कामना करण्यात आली. दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत, सायंकाळी सहा ते साडेआठ आणि रात्री साडेदहा ते बारा अशा मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करण्यात आले. पूजाविधीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी नेत्रदीपक रोषणाई व आतषबाजीने शहर उजळून गेले.

मंगळवारी सकाळपासूनच शहरात मांगल्याचे वातावरण पसरले होते.घरोघरी स्वच्छता, रांगोळ्यांचे सुंदर गालिचे, दरवळणार्‍या उदबत्त्या आणि झगमगत्या पणत्यांच्या प्रकाशात अंगण उजळून गेले होते. व्यापारी वर्गानेही दुकानांमध्ये सजावट करून लक्ष्मीमातेचे पूजन केले. लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्री उशिरापर्यंत आसमंत नेत्रदीपक आतषबाजीने फुलून गेला.

खरेदीला गर्दी

बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच नागरिकांची गर्दी उसळली होती. शहरातील राजारामपुरी, महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, पापाची तिकटी, बाजारगेट, महापालिका परिसर, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, कसबा बावडा परिसरातील बाजारपेठेत झेंडूची फुले, माळा, नारळ, कलश, बेंडबत्तासे, चुरमुरे, तसेच लक्ष्मी-कुबेर प्रतिमा, विड्याची पाने, आंब्याचे डहाळे, पाच फळांचा संच, कर्दळी, केळीची पाने यांना मोठी मागणी होती. लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तासाठी सर्वत्र तयारीचा उत्साह जाणवत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news