Kolhapur | कोल्हापूर विभागात पाच वर्षांत 366 मातांचा मृत्यू

Kolhapur Maternal Deaths
Kolhapur | कोल्हापूर विभागात पाच वर्षांत 366 मातांचा मृत्यू
Published on
Updated on

एकनाथ नाईक

कोल्हापूर : कोल्हापूर विभागात गेल्या पाच वर्षांत 366 मातांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधित सांगली जिल्ह्यातील 183 महिलांचा समावेश आहे. 2021-22 या आर्थिक वर्षांत 106, तर सर्वात कमी 2023-24 मध्ये 55 माता दगावल्या आहेत. मागील वर्षभरात जीव गमावलेल्या 68 मातांपैकी महापालिका कार्यक्षेत्रातील 49, तर ग्रामीण भागातील 19 माता आहेत.

आरोग्य विभागाकडून सूक्ष्म अभ्यास गरजेचा

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध योना राबविल्या जात आहेत. तरीदेखील प्रसूती दरम्यान मृत्यू होण्याचे प्रमाण कमी नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने सूक्ष्म अभ्यास करून माता मृत्यू रोखण्यासाठी कंबर कसली पाहिजे. जिल्हा, तालुका, गाव, वॉर्ड, घर अशी यंत्रणा कार्यान्वित करून गर्भवती मातांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. फक्त कागदोपत्री अहवालापेक्षा तळागाळापर्यंत पोहचून महिलांच्या आरोग्याची तपासणी गरजेची आहे.

एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 मधील मृत्यू

कोल्हापूर महापालिका : 24, ग्रामीण : 2

सांगली महापालिका : 24, ग्रामीण : 2

रत्नागिरी : 3

सिंधुदुर्ग : 0

जिल्हानिहाय 5 वर्षांतील मृत्यू

कोल्हापूर : 148

सांगली : 183

रत्नागिरी : 33

सिंधुदुर्ग : 3

विभागातील 5 वर्षांतील मृत्यू

2020-21 : 76

2021-22 : 106

2022-23 : 61

2023-24 : 55

2024-25 : 68

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news