Kolhapur rainfall | कोल्हापूर जिल्ह्यात बावीस वर्षांत दुसऱ्यांदा निच्चांकी पाऊस

सरासरी न गाठताच माघारीचा प्रवास; साडेतीन महिन्यांत अवघा ५२ टक्केच बरसला
Kolhapur Rainfall |
Kolhapur rainfall | कोल्हापूर जिल्ह्यात बावीस वर्षांत दुसऱ्यांदा निच्चांकी पाऊसFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात २००५ पासून गेल्या २२ वर्षांत यावर्षी आजअखेर दुसऱ्या निच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. पावसाळा संपण्यास आता केवळ दहा दिवसांचा कालावधी आहे, तत्पूर्वी पावसाच्या साडेतीन महिन्यांत केवळ ५२ टक्के पाऊस बरसला आहे. आता उर्वरीत दहा दिवसांत ४८ टक्के पाऊस होण्याची शक्यता नाहीच, त्यात शनिवारपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

जिल्ह्याकडे यंदाही पावसाने पाठ फिरवली. जुलै महिना वगळता, अन्य तीनही महिन्यांत समाधानकारक पाऊस झालाच नाही. परिणामी, जिल्ह्याची सरासरी कमी होत गेली. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात १७३३.१ मि.मी. इतका पाऊस होतो, शनिवार, दि.१९ सप्टेंबरपर्यंत यावर्षी केवळ ८७५ मि.मी.पाऊस झाला आहे. पावसाने यंदा सरासरी गाठायची म्हटले तर उर्वरीत दहा दिवसांत ८५८ मि.मी. पाऊस बरसण्याची आवश्यकता आहे. मात्र, इतका पाऊस होईल, याची शक्यता नाही.

सर्वाधिक बरसणाऱ्या तालुक्यात ४० टक्यापर्यंतच पाऊस

सर्वाधिक बरसणाऱ्या तालुक्याकडे यावर्षीही पावसाने पाठ फिरवत गेल्या तीन वर्षांचा पॅटर्न कायम ठेवला आहे. राधानगरी आणि चंदगड या तालुक्यात तर जेमतेम ४० टक्क्यापर्यंतच पाऊस झाला आहे. राधानगरीत ४०, चंदगडमध्ये ३९.७६ टक्के पाऊस झाला आहे. गगनबावड्यात ६२.१५, आजऱ्यात ५७.७५, भुदरगडमध्ये ६९.७९ टक्केच पाऊस झाला आहे.

कागलनेच गाठली सरासरी

जिल्ह्यात बारा तालुक्यांपैकी केवळ कागल तालुक्यातच पावसाने सरासरी गाठली आहे. या तालुक्यात चार महिन्यांत ६५०.६ मि.मी. पाऊस होतो, आजअखेर या तालुक्यात ६६१ मि.मी. पाऊस झाला आहे. आजअखेर तालुक्यात १०८.५५ टक्के पाऊस झाला आहे.

धरणे भरली; पण सप्टेंबरमध्येच पाणी सोडण्याची वेळ

जिल्ह्यात यावर्षी पावसाचा जोर कमी राहिला. सरासरीच्या कसाबसा निम्म्यापर्यंत पाऊस झाला आहे. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील बहुतांशी सर्व धरणे ऑगस्टच्या मध्यापर्यंत पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणे भरल्यानंतर पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. यामुळे शेतीसाठी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. परतीचा पाऊस चांगला झाला नाही तर पुढील महिन्यापासून धरणातून नियमित पाणी सोडावे लागणार आहे.

२०१५ मध्ये निच्चांकी पाऊस

जिल्ह्यात २००५ पासून २०२६ पर्यंत गेल्या २२ वर्षांत २०१५ मध्ये निच्चांकी पाऊस झाल. यावर्षी सरासरीच्या केवळ ४८ टक्केच पाऊस झाला. त्यानंतर यावर्षी सर्वात कमी पाऊस झाला आहे. आजअखेर ५२ टक्के झाला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत त्यात आणखी चार-पाच टक्क्यांची वाढ होईल, अशी शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news