KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर

राज्यातील भीषण परिस्थितीमुळे राज्य शासनाचा मोठा निर्णय
KDCC Bank Election
KDCC Bank Election
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (केडीसीसी) निवडणूक लांबणीवर पडणार असून, या निर्णयाने जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबणार आहेत.

दरम्यान, बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील १२३ हरकतींच्या सुनावण्या पूर्ण झाल्या असून गुरुवार (ता. २९) पर्यंत अपेक्षित असलेल्या निकालालाही आता प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

‘गोकुळ’नंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला होता. मतदार यादीवरील हरकतींच्या निकालानंतर पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र शासनाच्या निर्णयामुळे या हालचालींना तात्पुरता ब्रेक लागणार आहे. शासनाने दुष्‍काळ जाहीर केलेल्‍या राज्यातील ३०४ तालुक्‍यांत दुष्काळ निवारण व मदतकार्याला प्राधान्य देण्यासाठी विविध विभागांवर अतिरिक्त जबाबदारी आली आहे. या मदतकार्यावर परिणाम होण्याची शक्यता पाहून अखेर शासनाने सहकारी संस्‍थांच्‍या निवडणुका लांबणीवर टाकल्‍या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news