kolhapur News : जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना

प्रथमच डिजिटल स्वरूप
census
जनगणना File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात 16 मे ते 14 जून या कालावधीत जनगणना होणार आहे. त्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. प्रथमच डिजिटल स्वरूपात होत आहे.

सात हजारांवर अधिकारी-कर्मचारी

या जनगणनेसाठी 7 हजारांवर अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रधान जनगणना अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, तर जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी असे एकूण 25 चार्ज अधिकारी तालुकास्तरावर काम करत आहेत. 2 मास्टर ट्रेनर, 90 फिल्ड ट्रेनर, 989 पर्यवेक्षक तर 5,695 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वगणनेचा पर्याय

दि. 1 ते दि. 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वगणना करता येणार आहे. याकरिता जनगणनेसाठी तयार केलेले ॲप डाऊनलोड करून त्यात विचारलेल्या प्रश्नांद्वारे आपली माहिती भरायची आहे. यानंतर एक आयडी तयार होईल, हा आयडी क्रमांक (दि. 16) नंतर घरी घेणाऱ्या प्रगणकांना सांगायचा आहे, त्याद्वारे सर्व माहिती प्रगणकांकडे अपलोड होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news