

कोल्हापूर : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट काम करणार्या जिल्हा मध्यवर्ती बँकांसाठी देण्यात येणारा ‘वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ पुरस्कार सन 2023-24 सालासाठी पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला. पुरस्काराचे 26 वे वर्ष आहे.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ भगवंत कड, उपाध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे यांनी या पुरस्काराबद्दल बँकेचे अभिनंदन केले आहे.
सन 2022-23 या आर्थिक सालासाठीही बँकेला उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती बँक हा विशेष पुरस्कार मिळाला होता. लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यातयेणार आहे. बँकेच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी स्वयंरोजगार व उद्योग- व्यवसायाच्या उभारणीसाठी ताराराणी अर्थसाहाय्य योजना ही अल्प व्याजदराची कर्ज योजना सुरू केली आहे. तसेच बँकेने सभासद शेतकर्यांच्या कल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत.