

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे २०२६-२७ च्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १७ शिक्षकांची निवड करण्यात आली. याशिवाय एका शिक्षकाची विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी, तर चार शिक्षकांची प्रोत्साहनपर जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षक
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार : महादेव पांडुरंग गुरव (करवीर), ख्याती विश्वास चव्हाण (भुदरगड), अंकुश कुंडलिक पाटील (भुदरगड), मारुती तुकाराम पाटील (गगनबावडा), दीपक सांतरी गारे (चंदगड), अशोक बाळकृष्ण नोकुडकर (चंदगड), मारुती मधुकर गुरव (शाहूवाडी), विठ्ठल वसंत पाटील (शाहूवाडी), प्रकाश शंकर पाटील (राधानगरी), संतोष मारुती गुरव (आजरा), सुनील पुंडलिक सुरंगे (गडहिंग्लज), शैला लालासाहेब पाटील (पन्हाळा), आनंद बंडू म्हाळुंकर (पन्हाळा), तुकाराम दत्तू इंगळे (कागल), देवाप्पा आकराम गाडवे (शिरोळ), आनंद दादू घाटगे (हातकणंगले) आणि सागर रघुनाथ पाटील (हातकणंगले)
विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार : संजय राजाराम रेगे (करवीर)
प्रोत्साहनपर जिल्हा शिक्षक पुरस्कार : नीता अभिजित पाटील (करवीर), मधुकर शिवाजी मुसळे (राधानगरी), नंदकुमार हरी देसाई (गडहिंग्लज) आणि अर्चना अजित पाटील (शिरोळ)