Kolhapur CPR hospital : ‘सीपीआर’मध्‍ये धर्मशाळा

राज्यात सहा वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश
Kolhapur CPR hospital
‘सीपीआर’मध्‍ये धर्मशाळा
Published on
Updated on

अनिल देशमुख

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात सीपीआरसह राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालय आवारात धर्मशाळा होणार आहे. गुजरात राज्यातील सेवादान आरोग्य फाऊंडेशन, अहमदाबादकडून ना नफा - ना तोटा तत्त्वावर या धर्मशाळा उभारून चालवल्या जाणार आहेत. याकरिता या फाऊंडेशनला ४९ वर्षांसाठी रुग्णालयाच्या आवारातील जमीन एक रुपये प्रतिवर्ष नाममात्र भुईभाड्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अल्पदरात सुरक्षित निवास, स्वच्छतागृह, स्नानगृह, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी फाऊंडेशनने धर्मशाळा उभारण्याचा प्रस्ताव शासनाला दिला होता. या प्रस्तावाला अटी व शर्तीसह राज्य शासनाने सोमवारी मान्यता दिली. फौंडेशनकडून गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, छत्तीसगड व राजस्थान राज्यांतील विविध शासकीय रुग्णालयांत धर्मशाळा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात येत असल्याचेही या आदेशात म्हटले आहे.

या धर्मशाळा उभारणी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणी, देखरेख, समन्वय, तक्रार निवारण व शासन निर्णयातील अटी व शर्तीचे पालन करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पस्थळी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.

धर्मशाळेमुळे काय होणार...

रुग्णांच्या नातेवाईकांना अल्प दरात निवास, भोजन व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होणार. रुग्णांच्या कुटुंबीयांना भावनिक आधार मिळणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news