Kolhapur News : सहा तालुक्यांत पंचनामे सुरू

जीपीएस निर्देशांकासह क्षेत्राचे छायाचित्र घेणे बंधनकारक बाधित क्षेत्र, पीक प्रकार, सद्यस्थितीचा पंचनाम्यात समावेश
Kolhapur News
सहा तालुक्यांत पंचनामे सुरू
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांत मंगळवारपासून पंचनामे सुरू झाले. पंचनाम्यात पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करा, पंचनामा केलेल्या क्षेत्राचे जीपीएस निर्देशांकासह (जीपीएस कोऑर्डिनेट) छायाचित्र घेणे बंधनकारक आहे, त्यानुसार कार्यवाही करा, त्यात हलगर्जीपणा करू नका, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

जिल्ह्यात पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड या तालुक्यांना दुष्काळाचा ‘ट्रिगर १’ (पहिली कळ) लागू झाला आहे. या तालुक्यांत मंगळवारपासून पंचनामे सुरू झाले. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या आदेशानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी मंगळवारी पंचनाम्याच्या कार्यवाहीबाबतचे आदेश काढले. यानुसार बाधित पिकांचे पंचनामे संयुक्तपणे करा. पंचनाम्यात बाधित क्षेत्र, पिकाचा प्रकार, पिकाची सद्यस्थिती व नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करा, अशा सूचना दिल्या आहेत.

यासह सर्वेक्षण केलेल्या क्षेत्राचे स्पष्ट छायाचित्र व जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून जतन करून ठेवावे. गावनिहाय व पीकनिहाय बाधित क्षेत्राची माहिती तयार करा. पंचनामे करताना महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवावा. पंचनाम्याच्या आधारे पीक परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजनांची माहिती स्वतंत्रपणे संकलित करावी. पंचनाम्याची संकलित माहिती तत्काळ सादर करावी, असेही आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news