Kolhapur Crime News: चिपरी दिवसाढवळ्या हत्येने हादरली: पाठलाग करून तरुणाचा निर्घृण खून

kolhapur murder latest news: बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून घराकडे परतत असताना दिवसाढवळ्या हा खून झाल्याने संपूर्ण चिपरी गाव हादरले आहे, या घटनेने आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे
Kolhapur Murder Case
Kolhapur Murder CasePudhari Photo
Published on
Updated on

जयसिंगपूर: शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे बुधवारी (दि.६) सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. बहिणीला फाट्यावर सोडून घरी परतणाऱ्या संदेश लक्ष्मण शेळके (वय २२) या तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास येथील एका ऑइल मिलसमोर घडली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संदेश आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून घराकडे परतत होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला. जीव वाचवण्यासाठी तो धावत असतानाच, ऑइल मिलच्या गेटसमोर हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण चिपरी गाव हादरले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस वैयक्तिक वाद किंवा इतर कोणत्याही शक्यतेच्या दिशेने तपास करत आहेत. हल्लेखोर कोण होते आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे चिपरी आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news