

गुडाळ: खिंडी व्हरवडे ता. राधानगरी येथील यशवंत शामराव सावंत यांचा ट्रॅक्टर ( क्र.MH 09D 7340) खिंडी व्हरवडे येथून चोरीस जाणेची घटना गुरुवारी पहाटे च्या सुमारास घडली. याबाबत राधानगरी पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यशवंत सावंत यांचा ट्रॅक्टर शेती कामासाठी वापरला जातो.
गुरुवारी रात्री हा ट्रॅक्टर आकनूर रस्त्यावर गावातील मुख्य चौकात अंजनी कुमार विकास संस्थेच्या दारात उभा करण्यात आला होता. सकाळी साडेआठ च्या सुमारास शेतीकामासाठी यशवंत सावंत हे ट्रॅक्टर न्यायला गेले असता ट्रॅक्टर तेथून गायब झाल्याचे निदर्शनास आले. राधानगरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तानाजी पाटील अधिक तपास करीत आहेत.