Kolhapur News : विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या विकृताला महिलांकडून चोप

शाहू मैदान - आर. के. नगर बसमधील घटना
Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on: 
Updated on: 

पाचगाव : शाहू मैदान परिसरातून आर. के. नगरकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत एका विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या विकृताला महिलांनी चोप दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. संतप्त प्रवाशांनी या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बस संभाजीनगर परिसरात आली असता, गर्दीत एकाने विद्यार्थिनीची छेड काढली. विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखून आरडाओरड करताच बसमधील महिला प्रवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. महिलांनी तत्काळ त्याला पकडून जाब विचारत बसमध्येच चोप देण्यास सुरुवात केली. बस आर. के. नगर पोलिस चौकीजवळ पोहोचल्यावर त्याला खाली उतरवून पुन्हा चोप देण्यात आला आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव संदीप पाटील (रा. माळी गल्ली, कागल) असे सांगितले. मात्र, हा संशयित नेहमी याच मार्गावर प्रवास करत असून, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे छेडछाड केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. मागील महिन्यातही एका तरुणीने त्याला असाच हिसका दाखवला होता. प्रत्येक वेळी तो आपले नाव वेगळे सांगत असल्याचेही समोर आले आहे. अधिक तपास पोलिस अंमलदार अनिल आगले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news