Kolhapur Crime : गोबरगॅसच्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

साबळेवाडी (ता. करवीर) येथील घटना
Kolhapur Crime News
गोबरगॅसच्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू
Published on
Updated on

कोपार्डे : साबळेवाडी (ता. करवीर) येथील रियांश उत्तम पाटील या ४ वर्षाच्या बालकाचा गोबरगॅसच्‍या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

रियांश खेळता खेळता घराच्या पाठीमागे असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्यात पडला. त्यातच तो जखमी झाल्‍याने त्‍याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रियांश हा एकुलता एक होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री उशिरा साबळेवाडीत येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news