Kolhapur News : ओळखपत्राचा गैरवापर करून करचोरी

केंद्रीय जीएसटीची कारवाई, संशयित न्यायालयीन कोठडीत
Kolhapur News
ओळखपत्राचा गैरवापर करून करचोरी
Published on
Updated on

कोल्हापूर : स्वत:च्या नातेवाईकासह निकटवर्तीयांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून ६ बोगस कंपन्यांद्वारे कोणत्याही वस्तू अथवा सेवांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खरेदी- विक्रीचा व्यवहार न करता एकमेकांना तसेच इतर कंपन्यांना जीएसटीची बोगस बिले जारी करून १० कोटी ५७ लाखाच्या कर चोरीचा प्रकार चव्हाट्यावर आला. मुख्य संशयित कल्पेश बाळासाहेब कुंभार ( वय ४०, रा. कुंभार गल्ली, दत्त मंदिराजवळ, घुडेवाडी, ता. राधानगरी) याला कोल्हापूर केंद्रिय जीएसटी पथकाने सोमवारी जेरबंद केले.

संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. कोल्हापूर जीएसटी आयुक्त सुमितकुमार यादव, करचोरीविरोधी पथकाचे संयुक्त आयुक्त रोहित शर्मा यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोल्हापूर जीएसटी आयुक्तालयाच्या इतिहासात पहिलीच मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

पुलाची शिरोली येथील मे. रचना ॲग्रो सर्व्हिसेस, निर्मिती इंडस्ट्रिज या फर्मविरुध्द सुरू झालेल्या गोपनिय चौकशीतून हा प्रकार उघड झाला. पथकाने केलेल्या सखोल डेटा, विश्लेषण आणि पडताळणीमध्ये केवळ करचोरीच्या उद्देशाने उभारलेल्या बोगस कंपन्यांचे जाळे उघडकीला आले.

मे. रचना ॲग्रो सर्व्हिसेस, निर्मिती इंडस्ट्रिजचा भागीदार असलेल्या कल्पेश कुंभार हाच घोटाळ्याचा सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. संशयिताने स्वत:च्या नातेवाईकासह निकटवर्तीयांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून ६ बोगस कंपन्या स्थापन केल्या आहेत. कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही वस्तू अथवा सेवांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खरेदी-विक्री न करता एकमेकांना तसेच इतर कंपन्यांच्या माध्यमातून वस्तू अथवा सेवांची खरेदी-विक्री न करता जीएसटीची बोगस बिले जारी करून संशयिताने १० कोटी ५७ लाखाची कर चोरी केल्याचे उघड झाल्याचे सहाय्यक आयुक्त राम शंकर मीना, अधीक्षक गौतमकुमार, स्वप्निल वगरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news