Kolhapur Crime : स्टेटसवरून ओळख पटली अन्‌ सादचा गेम झाला..!

मुख्य सूत्रधाराची पोलिसांसमोर कबुली
Kolhapur Crime News
स्टेटसवरून ओळख पटली अन्‌ सादचा गेम झाला..!
Published on
Updated on

कोल्हापूर : वाढदिवसाच्या कारणातून दोन महिन्यांपूर्वी करण पुरी व सादने आदित्यवर चाकू हल्ला केला. टेंबलाईवाडी येथील युवकाच्या स्टेटसवरून सादची ओळख पटली. यानंतर दोन तरुणांना सादचा माग काढण्यासाठी ठेवले. आपल्यावर हल्ला करणार सादच असल्याची खात्री पटल्यानंतर सोमवारी रात्री अवघ्या १० मिनिटांत सादचा गेम केल्याची कबुली टेंबलाईवाडी खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आदित्य ओव्हळ याने बुधवारी पोलिसांसमोर दिली.

रिक्षाचालक सोहेब ऊर्फ साद मुबारक पठाण (वय २४, रा. मणेरमळा, उचगाव) याचा सोमवारी (दि. ८) रात्री टेंबलाईवाडी परिसरात खून झाला. याप्रकरणी मुख्य सूत्रधार आदित्य सुखदेव ओव्हळ (२४, रा. सुधाकर जोशीनगर), विशाल ज्ञानेश्वर सूर्यवंशी (२०, रा. बापुरामनगर, कळंबा), आयुष सदाशिव माने (२१, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर) यांच्यासह दोन अल्पवयीनांच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी सकाळी तिघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

खुनात वापरलेली दुचाकी, तलवार, एडका जप्त करणार असल्‍याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. दरम्यान, या खून प्रकरणात महेश भोरे याला ताब्यात घेण्यात आले असून, सराईत गुंड सचिन आगलावे याचा शोध सुरू आहे. या दोघांचा या खुनात सहभाग आहे काय, हे तपासून त्यांना सहआरोपी करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news