Kolhapur News : नागदेववाडीत बंगला फोडला; दागिने, रोकड लंपास

चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
Kolhapur News
नागदेववाडीत बंगला फोडला; दागिने, रोकड लंपास
Published on
Updated on

कोल्हापूर : नागदेववाडीतील सनी रमेश वासुदेव (वय 35, रा. अर्चना पार्क, दत्तनगर कॉलनी) यांचा बंद बंगला फोडून चोरट्याने 2 लाख 33 हजार रु. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड लंपास केली. शुक्रवारी (दि. 20) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. नागदेववाडीसह परिसरात तीन ठिकाणी चोरट्याने घरफोडीचा प्रयत्न केला आहे.

सनी वासुदेव कुटुंबीयासमवेत कुरुंदवाडला गावी यात्रेसाठी गेले होते. बंगल्याला कुलूप होते. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने प्रवेशद्वारावरील कुलूप कटावणीने उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचा दरवाजा उचकटून त्यामधील 28 ग््रॉमचे सोन्याचे गठंण, लॉकेट, साखळी, चांदीची लक्ष्मीची मूर्ती, चांदीची जोडवीसह अन्य दागिने व 5 हजारांची रोकड चोरट्याने लंपास केली. घरमालक वासुदेव यांनी करवीर पोलिस ठाण्यामध्ये घटनेची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. फुटेजमध्ये तीन चोरटे दिसत आहेत. फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news