Kolhapur News | प्रियकर फोन उचलत नसल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचा खळबळजनक कारनामा!

प्रियकरासोबतचे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल : युवकाला अटक, लॉज मालकही रडारवर, मुलीनेच व्हिडीओ व्हायरल केले की आणखी कुणी - पोलिसांकडून तपास सुरु
Kolhapur News
Kolhapur News | प्रियकर फोन उचलत नसल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचा खळबळजनक कारनामा!File Photo
Published on
Updated on

जयसिंगपूर : प्रियकर आपला फोन उचलत नाही आणि टाळाटाळ करतो, या रागातून एका अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना शिरोळ तालुक्यात घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून शिरोळ पोलिसांनी संबंधित युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान, हे व्हिडिओ त्या मुलीनेच स्वत: टाकले आहे का? किंवा अन्य कोणी फेक अकाऊंट काढून व्हायरल केले आहे का? याचाही पोलीस तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी आणि संबंधित युवक यांच्यात प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसले होते. प्रियकर आपला फोन उचलत नसल्याने संतापलेल्या मुलीने रागाच्या भरात स्वतःकडे असलेले ३ अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक केले. हे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

हे व्हिडिओ ज्या ठिकाणी चित्रित करण्यात आले, त्यावरून तपासाची चक्रे फिरली आहेत. हे कृत्य हातकणंगले तालुक्यातील एका लॉजवर घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे शिरोळ पोलिसांनी आता हातकणंगले तालुक्यातील संबंधित लॉज मालकालाही चौकशीसाठी पाचारण केले आहे. अल्पवयीन मुला-मुलींना नियमांचे उल्लंघन करून प्रवेश कसा दिला, यावरून लॉज मालकावरही कारवाईची टांगती तलवार आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून सोशल मीडियाचा घातक वापर आणि अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. दरम्यान, याबाबतची माहिती शिरोळ येथील पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला असता, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने याबाबतची माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news