Kolhapur Crime : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तरूणाला अटक; जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल
Kolhapur Crime News
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचारPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. उदयभान रामबहाल यादव (वय 25, रा. हाजरा सालेहपूर, संत कबीरनगर उत्तर प्रदेश, सध्या रा. उपनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

परप्रांतीय उदभान आणि संबंधित पीडित हे शहरातील एका उपनगरात भाड्याने राहतात. गेल्या वर्षभरापासून पीडित, उदयभान यांची ओळख होती. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याने मुलगी गर्भवती राहिली. तिच्या पोटात दुखू लागल्याने आईने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. यावेळी मुलगी गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. पीडितेच्या आईने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news