

नूल : गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे रविवारी रात्री ११ वाजता कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा विळ्याने सपासप वार करून निर्घृण खून केला आहे. या घटनेतील आरोपी पतीचे नाव भिमा चंद्राप्पा चितारी (वय ४३) असे असून, मृत पत्नीचे नाव चित्रांजली भिमा चितारी (वय ३८) आहे.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भिमा चितारी याला तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पाटील परशराम सरनाईक यांनी फिर्याद दिली असून, गडहिंग्लज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.