Kolhapur Crime : पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

वडगाव न्यायालय परिसरातील घटना
Kolhapur Crime
Kolhapur Crime(File Photo)
Published on
Updated on

पेठवडगाव : येथील न्यायालय आवारात मंगळवारी घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या पत्नीवर पतीने जीवघेणा हल्ला करत तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी पतीसह सासू आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र सतीश भोसले, सुमित्रा सतीश भोसले आणि राजेंद्र सतीश भोसले (सर्व रा. सुतार गल्ली, पेठवडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित पत्नी रूपाली रवींद्र भोसले (वय 32, सध्या रा. नऱ्हे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

रूपाली भोसले यांचा विवाह रवींद्र भोसले यांच्याशी झाला होता. मात्र, सासरच्या लोकांशी पटत नसल्याने त्यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खटल्याची तारीख असल्याने रूपाली न्यायालयात आल्या होत्या. न्यायालयाजवळील कँटिनमध्ये त्या वकिलांशी चर्चा करत असताना पती रवींद्र तिथे आला. ‌‘तू मला मुलांना भेटू देणार आहेस की नाही?‌’ असा जाब विचारत रवींद्रने रूपाली यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या रवींद्रने त्यांचे केस ओढून त्यांना खाली पाडले आणि ‌‘तुला आज जिवंत सोडणार नाही‌’ अशी धमकी देत त्यांच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. गळा आवळल्यामुळे रूपाली यांचा श्वास गुदमरू लागला होता. त्यांचा आरडाओरडा ऐकून कँटिनमधील आणि न्यायालय परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि त्यांची पतीच्या तावडीतून सुटका केली. याच दरम्यान, सासू सुमित्रा आणि दीर राजेंद्र यांनीही रूपाली यांना शिवीगाळ करत धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news